सोलापूर : शासनाच्या अनेक योजना असून, युवकांनी आपल्या गावातील गरजू, उपेक्षित नागरिकांना योजना मिळवून देण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितले.
युवाज्योत बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकारातून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने कवठे येथील १० लाभार्थीना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शीतल म्हेत्रे, सुमित भोसले, सरपंच मारुती इंजिनवारे, गणेश पाटील, महेश पाटील, अरविंद देवकते, बबन जगताप संस्थेचे अध्यक्ष आदित्य पाटील आदी उपस्थित होते.
गावाच्या विकासासाठी, सर्व स्तरातील गरजूंसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. अशा योजना ग्रामपंचायत पदाधिकारी, युवा संघटनांनी गावातील गरजवंतांना मिळवून देणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रश्नासाठी, न्याय हक्कांसाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे माने यांनी सांगितले. यावेळी बाजीराव नरोटे, भारत भोसले, भीमा पवार, चाचा चव्हाण, गोविंद राठोड, जैनुद्दीन शेख, लक्ष्मण केंगार, संजय चव्हाण, अविनाश राठोड, अमित पवार, ज्ञानेश्वर भोसले, दिलावर शेख, ओंकार केंगार, शिवानंद सोनकंटले, अमोल कोटगोंडे, लक्ष्मीकांत शिवशेट्टी, अक्षय पाटील, भार्गव बुर्गुल, रमजान पाटील, सुनील अरवत आदी उपस्थित होते.