28.1 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeमहाराष्ट्रजागावाटपाबाबत शिरसाट यांच्याशी कधीही बोललो नाही

जागावाटपाबाबत शिरसाट यांच्याशी कधीही बोललो नाही

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महायुतीत सहभागी होणार होते, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी हा दावा केला होता. त्यावर आता जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. माझेआणि संजय शिरसाट यांचे कधीही या विषयावर बोलणे झालेले नाही. त्यांना माझ्या मनातले कसे कळणार? त्यांचा या बोलण्याचा उद्देश मला माहित नाही, असे जयंत पाटील म्हणाले. तसंच आगामी लोकसभा निवडणूक आणि महाविकास आघाडीतील जागावाटप यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.

जयंत पाटील अजित पवार सोबत येणार होते म्हणून आमच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. हा प्रस्ताव त्यांनी पुण्यात दिला होता. जयंत पाटीलच याबाबत शरद पवारसाहेबांना सांगणार होते. जयंत पाटील शरीराने तिकडे आहेत मनाने इकडे आहेत. जयंत पाटील आता आले नाहीत. मात्र ते आमच्यासोबत येतील, असे संजय शिरसाट यांना काल म्हटलं. शिरसाट यांच्या दाव्यावर आता जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

ही लढाई विचारांची
प्रत्येक जण निवडणूक जिंकण्यासाठीच प्रयत्न करत असतो. महाराष्ट्रातील लोक आमची भूमिका मान्य करतील अशी आशा आहे. चांगले राज्य चालवण्यासाठी जनता आम्हाला आशीर्वाद देतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचाही अस्तित्व महाराष्ट्रात मोठे आहे. ही अस्तित्वाची नाही तर विचारांची लढाई आहे. सद्यस्थितीला देशाची स्थिती चिंताजनक ज्यांना वाटते. त्यामुळे अनेकजण आमच्यासोबत यायचा विचार करतील, असंही जयंत पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR