नवी दिल्ली : गँगस्टर गोल्डी ब्रार याला केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी लखबीर सिंह यालासुद्धा केंद्राने दहशतवादी घोषित केले होते. हे दोघेही कॅनडामध्ये लपून बसलेले आहेत.
पंजाबमध्ये खंडणी आणि सीमेपलीकडून शस्त्रास्त्रासह अंमली पदार्थांच्या तस्करीमध्येही त्यांचा सहभाग आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डीने त्याची जबाबदारी स्वीकारली होती. गोल्डी ब्रार हा खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याशी जवळीक ठेवून असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे ब्रार याने यापूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खानला धमकी दिली होती.
मुंबईतले काँग्रेसचे नेते तथा मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये गोल्डीने धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले होते. आता केंद्र सरकारने त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.