32.5 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeसोलापूरसोलापुरात इंधन टँकरचालकांचा संप मागे

सोलापुरात इंधन टँकरचालकांचा संप मागे

पोलिसांच्या मध्यस्थीने पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरू

सोलापूर : नवीन वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात ट्रकचालक आणि इंधन टँकरचालकांनी संपाची हाक दिल्याने अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात देखील नवीन वाहतूक कायद्याच्या विरोधात पेट्रोल-डिझेल टँकरचालक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.

तर, सोलापुरातील हिंदुस्थान पेट्रोलियम येथील डेपोमधील टँकरचालकांनी संप पुकारला होता. मात्र, पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्याने टँकरचालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे. तर, वाहतूक सुरू केली असली तरीही कायद्यातील तरतुदींना मात्र वाहनचालकांचा विरोध कायम आहे.

नवीन वाहन कायद्याला विरोध करत सोलापुरातील हिंदुस्थान पेट्रोलियम येथील डेपोमधील टँकरचालकांनी संप पुकारला होता. प्रत्येक अपघातामध्ये केवळ वाहनचालकांना दोषी ठरवले जाते, अनेक वेळा चूक समोरच्याची असते. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही.

चालकांना केवळ दहा ते पंधरा हजार रुपये पगार असतो, अशी परिस्थिती असताना लाखो रुपयांचा दंड कसा भरायचा? असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्याने टँकरचालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे. तर, सोलापुरातील तीन पेट्रोल-डिझेल डेपोवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. रस्त्यातही पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, पोलिसांच्या बंदोबस्तात इंधन वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या मध्यस्थीने सोलापूरसह ६ जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरू झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR