26.4 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeपरभणीफुलकळस शिवारात रानडुकरांच्या हैदोसाने पिके उध्दवस्त

फुलकळस शिवारात रानडुकरांच्या हैदोसाने पिके उध्दवस्त

पूर्णा : तालुक्यातील फुलकळस शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारीची पेरणी करण्यात आलेली आहे. परंतू उभ्या पिकांमध्ये रानडुकरे हैदोस घालत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. रानडुकराच्या उपद्रवाने शेतकरी हैराण झाले आहेत.

फुलकळस व परिसरातील अनेक शेतक-यांकडे गाय, म्हैस, बैल यांना खाण्यासाठी कडबा उपलब्ध होईल या आशेने शेतक-यांनी ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाची पेरणी केली जाते. कापूस, ऊस आदी पिकांच्या तुलनेत ज्वारीची पेरणी अधिक आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर लपण असल्यामुळे डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ही रानडुकरे ज्वारीच्या शेतीमध्ये शिरून ज्वारी पिकाचे नुकसान करीत आहेत.

ज्वारी खाण्याबरोबरच ज्वारीत दडून बसलेली रानडुकरे खत, पाणी देणा-या शेतक-यावरही हल्ला करु शकतात. त्यामुळे शेतक-यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. वनविभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतक-यांमधून होत आहे. दरम्यान फुलकळस शिवारातील ज्वारी पिकाचे डुकरांच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे या बाबीची स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दखल घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी ज्वारी उत्पादक शेतकरी माणिक गणपतराव नावकिकर, देवानंद गणपतराव नावकिकर फुलकळस यांनी केली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR