27 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeराष्ट्रीयहिजबुल मुजाहिद्दीनच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला अटक

हिजबुल मुजाहिद्दीनच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने हिजबुल मुजाहिद्दीनच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला अटक केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. जावेद अहमद मट्टू असे या दहशतवाद्याचे नाव असून तो जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी होता.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनुसार, राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाने त्याच्या शोधासाठी शोध मोहीम सुरू केली होती. जम्मू-काश्मीरच्या सोपोरचा राहणारा हा दहशतवादीही पाकिस्तानात गेला होता. गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या एका व्हीडीओमध्ये जावेदचा भाऊ रईस मट्टू जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये राष्ट्रध्वज फडकावताना दिसत होता. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये मट्टूचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR