23.6 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रमला मंत्रिपदाची पर्वा नाही : छगन भुजबळ

मला मंत्रिपदाची पर्वा नाही : छगन भुजबळ

ओबीसींच्या ताटातून आरक्षण घेणे चूक, जरांगे पाटलांवर बोचरा वार

पंढरपूर : काही जण म्हणत होते की तुम्ही मराठा ओबीसी ते जालनावाले मला सातत्याने शिव्या देत होते. मला त्याचं नावही घ्यायचं नाही. पण जेव्हा बीड पेटवलं, त्यावेळी ती लोकं कशी वाचली. त्यांना जाऊन सांगा एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद करणं चूक आहे, असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगेवर थेट वार केला.

मी थांबायला तयार आहे. समोरच्यांना सांगा ओबीसीतून आरक्षण घेणं चूक आहे. घरं पेटवणं चूक, शासनाला धमकी देणे चूक, बालिषपणाच्या मागण्या करणे थांबवा म्हणून सांगा त्यांना. आहे का धाडस? त्यांच्याकडे मते मग आमचीही मते द्यायच्या वेळी किंमत चुकवू, असा थेट इशारा भुजबळांनी यावेळी दिला.

मला धमक्या देऊ नका
आजच्या ओबीसी मेळाव्यातून देखील भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मला धमक्या देऊ नका. शरीफ है हम लेकीन किसी के बाप से डरते नाही. चप्पल खायला आम्ही काय नाबर आहोत? असं म्हणत भुजबळ पुन्हा एकदा बरसले.

आज अन्याय करणारे बदलेल आहेत, ज्योतिबांनी जेव्हा शाळा काढण्याचं काम हाती घेतलं त्यांच्यासोबत अनेक ब्राम्हण देखील होते. त्यांना ब्राम्हणांनी मदत केली. काहीही झालं तरी आम्ही ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही
ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. आरक्षण स्वतंत्र घ्या. आमचा मराठा आरक्षणाला आणि मराठा समाजालाही विरोध नाही. पण आरक्षणाखाली जी झुंडशाही सुरु आहे, त्याला आमचा विरोध आहे.

ती मावळ्यांची सेना होती
शिवरायांच्या नावावरुन आम्हाला बोललं जातं. पण लक्षात ठेवा छत्रपतींची मराठा सेना नव्हती ती मावळसेना होती. छत्रपतींची समाधी ही महात्मा फुलेंनी शोधून काढली. पहिली शिवजयंती फुलेंनी सुरु केली. पहिला पोवाडा फुलेंनी सुरु केला. शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि आमच्यावर हल्ले करता असा सवाल देखील भुजबळांनी यावेळी उपस्थित केला.

आरक्षण हे तुम्हाला तुम्ही श्रीमंत आहात याच्यावर नाही, तुम्ही सामाजिक दृष्ट्या किती मागलेले आहात याच्यावर अवलंबून आहे. मंत्रालयातही ५४ टक्के मराठा समाजाची माणसं आहे, असं म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर थेट वार केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR