मुंबई : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) मुंबई युनिटने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील बोरिवली परिसरातील एका गेस्ट हाऊसवर काही लोक लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिका-यांनी छापा टाकला.
या छाप्यात गेस्ट हाऊसमधून ६ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३ बंदुका आणि ३६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
एटीएसशी संबंधित तपास अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व लोक दिल्लीचे रहिवासी आहेत. आता हे लोक दिल्लीहून मुंबईत कशासाठी आले होते? याबाबत अद्याप काहीही माहिती नाही. पोलीस या संदर्भातील कटाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.