29.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeक्रीडारोहित शर्मा- विराट कोहली १४ महिन्यांनी टी-२० संघात

रोहित शर्मा- विराट कोहली १४ महिन्यांनी टी-२० संघात

मुंबई : अफगाणिस्तान विरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. टीम इंडियात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं १४ महिन्यांनी कमबॅक झालं आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील या टी-२० सीरिजला ११ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर १७ जानेवारीला अखेरचा सामना पार पडणार आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी याआधी टी-२० वर्ल्ड कप २०२२ सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. तेव्हापासून हे दोघेही या टी-२० फॉर्मेटपासून दूर होते. मात्र आता आगामी टी-२० वर्ल्ड कप २०२४ साठीच्या तयारीसाठी दोघांचं पुन्हा संघात पुनरागमन झालं आहे.

हा वर्ल्ड कप १ ते २९ जून दरम्यान पार पडणार आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी फार कमी वेळ आहे. या ५ महिन्यांच्या कालावधीत टीम इंडियाला मोजकेच टी-२० सामने खेळायला मिळणार आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्धची टी-२० मालिका फार महत्त्वाची आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ंिरकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉश्ािंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान टीम : इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR