रेणापूर : प्रतिनिधी
अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीचा पत्नीनेने अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना रेणापूर तालुक्यातील डिघोळ देशमुख येथे शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. वैभव ज्योतीराम निकम, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी पत्नी (नेहा वैभव निकम ) व तिच्या अल्पवयीन प्रियकरालाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
रेणापूर तालुक्यातील डिगोळ देशमुख येथील वैभव ज्योतीराम निकम (वय ३४ वर्षे) हा टेम्पो चालक असून तो पत्नी नेहा निकम, एक मुलगा व मुलीसह गावात वास्तव्यास होता. दि २ जानेवारीपासून घरात कोणालाही न सांगता तो निघून गेला होता त्याची शोधा शोध करूनही शोध लागत नसल्याने त्याचा भाऊ सुरज ज्योतीराम निकम यानी दि. ५ जानेवारी रोजी रेणापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. दरम्यान दि ६ जानेवारी रोजी डिगोळ देशमुख शिवारातील श्रीराम पवार यांच्या शेतालगत असलेल्या बराशित मृतदेह आढळून आला. याची माहिती गावातील नागरीकांनी रेणापूर पोलीस ठाण्यास दिल्यावरून पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे, पोलीस जमादार एस व्ही शेंबाळे, व्ही. एस. मागडगे घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदरील मृतदेहाचे शवविच्छेदन पोहरेगाव येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात करण्यात आले..तेथील वैद्यकीय अधिका-यांंनी उशीरा शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर वैभव यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आले .
यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा चाकूर-रेणापूर उपविभागाचे उपाधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी भेट देऊन घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाच्या सूचना केल्या. अंन्त्यविधी झाल्यानंतर मयताचा भाऊ सुरज ज्योतीराम निकम यांनी माझी भावजय आणि तिचा प्रियकरास माझ्या भावाने एकत्र बघितल्याने व त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने भावजय नेहा निकम व अल्पवयीन प्रियकर या दोघांनी मिळून भावाच्या डोक्यात काठीने मारून जखमी करून नंतर दोघानी मिळून गळा आवळून खुन केला. मयत वैभवचे प्रेत डिगोळ देशमुख शिवरातील श्रीराम पवार यांच्या शेतालगत असलेल्या बराशित नेहून टाकले व पुरावा नष्ट करण्यासाठी दोघानी मिळून रक्ताने माखलेली गोधडी घराच्या मागे जाळून पुरावा नष्ट केला अशा आशयाची फिर्याद रेणापूर पोलीस ठाण्यात दिल्यावरून पोलीसांनी गुरनं ६ / २३ कलम ३०२ ,२०१ ‘३४ आयपीसीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे, पोलीस उपनिरीक्षक जिलानी मानुल्ला व पोलीस कर्मचारी अभिजीत थोरात, किरण गंभिरे हे करीत आहेत.