उत्तर गाझा : इस्रायलवर वारंवार ७ ऑक्टोबर प्रमाणे हल्ले करणार असल्याचे हमासने म्हटले आहे. इस्रायलला त्यांच्या भूमीवर स्थान नाही. हमास पॉलिटिकल ब्युरोचे सदस्य आणि प्रवक्ते गाझी हमद यांनी लेबनीज चॅनेल एलबीसी २४ ला एक मुलाखत दिली, जी बुधवारी मध्य पूर्व मीडिया रिसर्च इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केली.
यामध्ये हमास कमांडर म्हणाले की आम्हाला इस्रायलला धडा शिकवावा लागेल आणि आम्ही ते पुन्हा पुन्हा करू. अल-अक्सा फ्लड ऑपरेशन ही फक्त सुरुवात आहे. आम्ही ७ ऑक्टोबर प्रमाणे दोन, तीन आणि अगदी चार वेळा हल्ला करू. इस्रायलचे अस्तित्व मूर्खपणाचे आहे आणि आम्ही ते सर्व पॅलेस्टिनी भूमीतून (वेस्ट बँक, गोलान हाइट्स) पुसून टाकू. हमाद पुढे म्हणाले की इस्रायलचे अस्तित्व अरब आणि इस्लामिक देशांच्या सुरक्षा, सैन्य आणि राजकारणासाठी आपत्ती आहे. हे सांगायला आम्हाला लाज वाटत नाही. या युद्धाचीकिंमतही आम्हाला चुकवावी लागेल आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत. पॅलेस्टाईनला शहीदांचा देश म्हटले जाते आणि शहीदांच्या बलिदानाचा आम्हाला अभिमान आहे.
नागरिकांचे नुकसान हेतू नव्हे
हमास कमांडर म्हणाले की आम्ही ७५ वर्षांपासून इस्रायलच्या ताब्याचे बळी आहोत. यामुळे आम्ही जे काही केले त्याचा आरोप करता येणार नाही. ७ ऑक्टोबर, १० ऑक्टोबर किंवा इतर कोणत्याही तारखेला जे काही घडले ते सत्य आहे. नागरिकांचे नुकसान करण्याचा हमासचा कधीही हेतूू नव्हता. पण जमिनीवरील हल्ल्यात अनेक अडचणी आल्या.