24.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूर'समांतर' जलवाहिनीला टेंभुर्णीकरांची विरोधाची भूमिका कायम

‘समांतर’ जलवाहिनीला टेंभुर्णीकरांची विरोधाची भूमिका कायम

सोलापूर : भाजप आमदार आणि जिल्हा प्रशासनाच्या इशाऱ्यानंतरही टेंभुर्णीतील राजकीय नेत्यांनी उज्जनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम करण्यास विरोध केला आहे. काम सुरू केले, तर आंदोलन सुरू करू, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांनी दिला. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उजनी ते सोलापूर या ११० किलोमीटर समांतर जलवाहिनीचे काम सुरू आहे. एकूण ८८२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

सोलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या डाव्या बाजूने महामार्ग प्राधिकरणाच्या जागेतून है पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. उत्तर सोलापूर, मोहोळ तालुक्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. टेंभुर्णी गावातून हे काम करण्यास ग्रामपंचायतीने विरोध केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डीपीसीच्या बैठकीत याविषयावर चर्चा झाली. भाजपचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांनी जाहीरपणे या कामास विरोध केला. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे आहे. गावातील रस्ते, पाइपलाइन खराब होत असतील तर सरकारकडून दुरुस्ती होईल. तुम्ही काम अडवू नका, असे आमदार विजयकुमार देशमुख आणि शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी सांगितले होते.

समांतर जलवाहिनीचे ११०किलोमीटरपैकी ५८ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. टेंभुर्णी हद्दीत तीन किलोमीटरचे काम आहे. ग्रामपंचायतीने विरोध केला आहे. मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात नुकतीच बैठक लावली होती. जिल्हा प्रशासनाने कारवाईचा शब्द दिला. त्यामुळे आम्ही काम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पाइपचा पुरवठा झाला की, काम सुरू होईल. उजनी धरणावरील जॅकवेलचे कामही ४५ टक्के पूर्ण झाले आहे. जून, २०२४ अखेर ही योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे.असे स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी सांगीतले.

राजमार्ग प्राधिकरणाची जागा नाही. गावात हायवे लगत ड्रेनेजलाइन प्रस्तावित आहे. समांतर जलवाहिनी टाकली तर ड्रेनेज लाइनसाठी जागा राहणार नाही. गावचे रस्तेही खराब होतील, त्यामुळे आम्ही काहीही झाले तरी काम होऊ देणार नाही. आंदोलन करू,असे भाजप तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांनी सांगीतले.
दरम्यान, टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या या विरोध प्रकरणाबद्दल मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांना पत्र पाठवले होते. या प्रकरणात लक्ष टेंभुर्णी गावात राष्ट्रीय घालून कामात अडथळा होऊ नये, अशी विनंती केली होती. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे यासंदर्भात बैठक झाली होती. ग्रामपंचायतीला सरकारी लोकहिताचे काम अडविण्याचा आणि ठराव करण्याचा अधिकार नाही. आम्ही ग्रामपंचायतीवर कारवाई करू, तुम्ही काम सुरू करा, असे जिल्हाधिकायांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनातील अधिकान्यांनी या बैठकीत दिला होता. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी कामाची तयारी सुरू केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR