30.6 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूरउमरदरा येथे बसला अज्ञाताकडून आग

उमरदरा येथे बसला अज्ञाताकडून आग

जळकोट : प्रतिनिधी
उदगीर ते उमरदरा ही मुक्कामी बस जळकोट तालुक्यातील  उमरदरा या गावाजवळ दि ७ जानेवारी रोजी संध्याकाळी बंद पडली. तेथेच बस लावून चालक आणि वाहक एसटीमध्ये झोपी गेले मात्र दि ७ जानेवारी ते ८ जानेवारी रोजीच्या मध्यरात्री अचानक बसला आग लागली. वाहक आणि चालकाला काही कळण्याच्या आतच बस जळून खाक झाली. यामध्ये एसटी महामंडळाचे सुमारे १३ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने चालक आणि वाहकाला कुठलीही इजा झाली नाही.
जळकोट पोलीस ठाण्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची तक्रार देण्यात आली मात्र एसटी बस थांबल्या जागी शॉर्टसर्किट होणे अशक्य आहे . यामुळे एसटी बसला कोणीतरी मध्यरात्री आग लावली असावी. असा अंदाज व्यक्त केला जात आहे . एसटी बसच्या डिझेल टाकीचे लावलेले कुलूप कोणीतरी तोडले असल्याचेही निदर्शनास आले आहे . उदगीर आगाराची बस क्रमांक एम एच २० बीएल १४५४ ही  उमरदरा येथे बंद पडल्याने चालक व वाहक बसमध्ये झोपले असता दि ८ जानेवारी २०२४ रोजी १.३० वा सुमारास बसच्या मेन्स स्विच सर्किट होऊन आग लागून बसचेकिंमत अंदाजे १३ लाख रुपये व वाहकाचे मोबाईल विवो कंपनी आठ हजार रुपये जळून एकूण १३ लाख ८ हजार रुपयांचे नुकसान झाले, अशी तक्रार बसचा चालक अंकुश रामराव गिरी यांनी जळकोट पोलीस ठाण्यात दिली आहे . याप्रकरणी अकस्मात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल केंद्र हे करीत
आहेत.  ही माहिती ग्रामस्थांना कळताच येथील शिवसेनेचे कार्यकर्ते  गुट्टे यांनी जळकोट पोलिसांना याची माहिती दिली तसेच यावेळी अहमदपूर येथील अग्निशामक दलाला फोन करण्यात आला. अग्निशामक दलाची गाडी एक तासानंतर पोहोचली तोपर्यंत एसटी जळून खाक झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR