17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूर५२ व्या अमेरिकन स्त्री रोग लॅप्रोस्कोपिक परिषद, डॉ. कल्याण बरमदे यांची निवड

५२ व्या अमेरिकन स्त्री रोग लॅप्रोस्कोपिक परिषद, डॉ. कल्याण बरमदे यांची निवड

लातूर : प्रतिनिधी
लातूरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वंध्यत्व व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. कल्याण बरमदे यांची अमेरिकेतील नॅशविल येथे अमेरिकन स्त्री रोग लॅप्रोस्कोपिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५२ व्या अमेरिकन स्त्री रोग लॅप्रोस्कोपिक परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये एका चर्चासत्रामध्ये ते संबोधित करणार आहेत. या परिषदेसाठी ते अमेरिकेला रवाना होत आहेत.

दक्षिण अमेरिकेच्या टेंन्ससी राज्यातील नॅशविल येथे दि. ५ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ही अमेरिकन स्त्री रोग लॅप्रोस्कोपिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जगभरातील मान्यवर स्त्री रोग तज्ज्ञ, लॅप्रोस्कोपिक तसेच एंडोस्कोपिक सर्जनना पाचारण करण्यात आले आहे. लातूर मराठवाड्यातून हा बहुमान मागच्या दोन दशकांपासून महिलांना, विशेषत: वंध्यत्व निवारण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा उपलब्ध करुन देणा-या डॉ. कल्याण बरमदे यांना मिळाला आहे.

एएजीएलचे अध्यक्ष डॉ. अँड्रयू आय. सोकोल व त्यांच्या सहका-यांच्या आग्रहपूर्वक निमंत्रणाचा स्वीकार करुन डॉ. कल्याण बरमदे अमेरिकेला रवाना होत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल डॉ. अजय पुनपाळे, डॉ. अजय जाधव, डॉ. अनिल वळसे, डॉ. संदीपान साबदे, डॉ. रमेश भराटे, डॉ. संजय शिवपुजे, डॉ. ओमप्रकाश भोसले, डॉ. संजय पौळ पाटील, डॉ. राजकुमार दाताळ, डॉ. पवन लड्डा व आयएमएच्या सर्व पदाधिका-यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR