20.9 C
Latur
Thursday, October 24, 2024
Homeमहाराष्ट्रबारामती येथे मराठी बालकुमार सहित्य संमेलन

बारामती येथे मराठी बालकुमार सहित्य संमेलन

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद बारामती शाखेच्या वतीने येत्या दि.२० आणि २१ जानेवारीला अमरेन्द्र – भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे पाचवे अखिल भारतीय मराठी बालकुमार सहित्य संमेलन बारामती येथे होत असून यामध्ये शालेय विद्यार्थी  सहभागी होतील.

संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत सांगितली. संमेलन अध्यक्ष म्हणून लेखिका स्वाती राजे यांची निवड करण्यात आली आहे स्वागताध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सुनेत्रा पवार साहित्य परिषद कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवस चालर्णा­या साहित्य संमेलनात विविध विषयांवर चर्चा ,कथाकथन ,काव्य संमेलन परिसंवाद ,बालनाट्य आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . बारामती मधील नटराज नाट्य मंदिर येथे संमेलन होणार आहे. असे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR