बंगळुरू : एका आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) कंपनीच्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारीे (सीईओ) सूचना सेठ यांनी चार वर्षाच्या मुलाचा खून केला. त्यानंतर ती मुलाचा मृतदेह घेऊन गोव्यातून कर्नाटकात जात होती. पण, पोलिसांनी अटक केली.
सूचना सेठने शनिवारी (६ जानेवारी) गोव्यातील कँडोलीम येथील हॉटेलमध्ये मुलाचा खून केला. त्यानंतर मृतदेह पिशवीत भरून ती टॅक्सीने कर्नाटककडे जाताना चित्रदुर्ग येथे पोलिसांनी सूचना सेठला अटक केली.
सूचना सेठ आणि तिच्या पतीमध्ये कडाक्याचे भांडणं होत होते. त्यामुळे सूचना सेठने आणि पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण, न्यायालयाने दर रविवारी वडिलांना मुलाला भेटण्याची परवानगी दिली होती. न्यायालयाचा हा आदेश सूचनाला पसंत पडला नव्हता. त्यातच रविवारी (८ जानेवारी) वडिलांची भेट होऊ नये म्हणून सूचनाने मुलाचा खून केला.
सूचना सेठ यांनी चेक आउट केल्यानंतर हॉटेलचे कर्मचारी रूम साफ करण्यासाठी गेले होते. तेव्हा, कर्मचा-यांना रक्ताचे डाग आढळले. तसेच, सूचना सेठ मुलासह हॉटेलमध्ये आली होती. मात्र परत जाताना एकटीच गेल्याने कर्मचा-यांना संशय आला. तपासाची चक्रे गतिमान झाली. मुलाचा मृतदेह पिशवीत कोंबून घेऊन जाताना सूचना सेठला अटक करण्यात आली.