20.4 C
Latur
Wednesday, January 1, 2025
Homeराष्ट्रीयपाल पडलेले दूध पिल्याने २३ विद्यार्थ्यांना विषबाधा

पाल पडलेले दूध पिल्याने २३ विद्यार्थ्यांना विषबाधा

बेळगावी : पाल पडलेले दूध पिल्याने २३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील बेळगावी येथील एका शाळेतील हा प्रकार उघडकीस आला आहे. शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा झाल्याच्या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दुधातून विषबाषा झाल्यामुळे २३ विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिक्षण विभागाकडून या प्रकरणी अधिक तपास आणि चौकशी सुरु आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बेळगावी येथील सरकारी प्राथमिक शाळेत गुरुवारी, ११ जानेवारीला सकाळी मृत पाल असलेले दूध प्यायल्याने सुमारे २३ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, यानंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी शिक्षण विभागाने तपास सुरू केला आहे.

दोषींवर योग्य ती कारवाई होईल
या घटनेची माहिती मिळताच हुक्केरी गटशिक्षण अधिकारी प्रभावती पाटील यांनी शाळेला भेट दिली. शिक्षणाधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगावी शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सर्व दूध पिणा-या मुलांना संकेश्वर रुग्णालयात दाखल केलं. विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचं मूळ कारण सांगणं टाळले. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याचा शोध घेतला जाईल अशी माहिती शिक्षण अधिका-यांनी दिली आहे. याप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR