24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपोलिसांनी दिली गैरवर्तवणूक; महिलेला ८ कोटींची भरपाई

पोलिसांनी दिली गैरवर्तवणूक; महिलेला ८ कोटींची भरपाई

वेस्ट मिडलँड्स : पोलिसांविरुद्ध लैंगिक भेदभावाचा खटला जिंकल्यानंतर एका माजी महिला अधिका-याला ८ कोटी ७० लाख रुपयांची भरपाई देण्यात आली. कामगार न्यायालयात झालेल्या सुनावणीत रेबेका कैलम नावाच्या महिलेला २०१२ मध्ये सुरक्षा दलाच्या फायम आर्म्स यूनिटमध्ये पोस्टर गर्ल बनवण्यात आले होते. त्याचसोबत जोपर्यंत तिची सहमती मिळत नाही तोवर तिला ट्रेनिंगपासून रोखले होते.

२०१६ मध्ये जेव्हा ही महिला गरोदर होती तेव्हा तिला फोटो शूट करण्यासाठी पोझ देण्यास सांगितली होती. तेव्हा पुरुष अधिका-यांकडून या महिलेशी गैरवर्तवणूक झाल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

मार्च २०१२ मध्ये प्रशिक्षण कालावधीत कैलमला तिची अंतवस्त्रेही उतरण्यास सांगितले होते. एका महिलेबद्दल अशाप्रकारे पुरुष अधिका-यांची वागणूक कशारितीची आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो असे सुनावणीत युक्तिवाद करण्यात आला. त्याचसोबत जेव्हा महिलेला प्रेस अप करायला सांगितले तेव्हा पुरुष प्रशिक्षकाने त्याचे पाय महिलेच्या मानेजवळ ठेवले. तुझ्याकडे स्तन आहेत याचा अर्थ तू प्रेसअप करू शकत नाही असे या अधिका-याने म्हटले. लैंगिक भेदभाव आणि छळ केल्याचा खटला महिलेने कामगार न्यायालयात दाखल केला होता. त्यासाठी सुरुवातीला तिला ३ लाख १८ हजार नुकसान भरपाई देण्यात आली होती.

वेस्ट मिडलँडस पोलिसांनी एक महिला म्हणून कैलमसोबत जी काही वर्तवणूक केली त्याबद्दल आता तिला ८ कोटी ७० लाख भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहे. जी आतापर्यंतची सर्वात जास्त भरपाई आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR