27.2 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeमुख्य बातम्याआरक्षणाबाबत एकतर्फी विचार करणा-यांनी त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करावा : भुजबळांचा इशारा

आरक्षणाबाबत एकतर्फी विचार करणा-यांनी त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करावा : भुजबळांचा इशारा

बीड : आरक्षणाबाबत एकतर्फी विचार करणा-यांनी सुद्धा राजकीय भविष्याचा विचार करावा. मग व्यक्ती असेल, पुढारी असेल किंवा पक्ष असेल. राजकीय नेते ओबीसींसाठी काय निर्णय घेतात याकडे सर्व समाजाचे लक्ष लागून राहिले आहे. कुणावर अन्याय करतात हे सुद्धा पाहतोय. पक्ष चालवायचे आहे त्यामुळे नीट विचार करा, असा थेट इशारा छगन भुजबळांनी दिला.

ओबीसी आरक्षण देखील दोन वर्षात मिळालेले नाही, नेहरुंच्या काळापासून प्रयत्न सुरु होते आणि आम्हाला अजूनही लढावे लागत आहे. ओबीसींसाठी अखेरपर्यंत लढणार असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. आरक्षण दिले नाही तर पूर्ण राज्य पेटवून टाकू, लोकांना घाबरवून टाकू असे स्वरुप राज्यात सध्या धारण केले गेले. इतर समाजातील लोक सुद्धा आहेत, हे राज्यात मराठा समाजाला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

माझ्या राजकीय भविष्याची परवा नाही – भुजबळ
मला माझ्या राजकीय भविष्याची परवा नाही, मला आमदारकीची पर्वा नाही, मला माझ्या मंत्री पदाची फिकीर नाही, राजकीय भविष्याची चिंता नाही ज्यांना काळजी असेल ते विचार करत असतील, असे छगन भुजबळांनी म्हटले. देशाच्या संपत्तीवर फक्त ठराविक लोकांचा अधिकार आहे का? असा सवाल देखील भुजबळांनी उपस्थित केला.

सव्वा कोटी येतात की तीन कोटी पाहू – भुजबळ
कायदा सुव्यवस्थेचा विचार गृह खाते आणि सामान्य लोक करतील. ते आंदोलन करु शकतात आणि ओबीसी मुंबईत धडकू शकणार नाहीत, असे नाही. सव्वा कोटी लोक येतात की तीन कोटी मुंबईत येतात ते पाहू, असे म्हणत मुंबईत होणा-या मराठा आंदोलनावर छगन भुजबळांनी भाष्य केले.

ओबीसीतूनच मराठा आरक्षण हवे या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत, तर ओबीसीतून मराठा आरक्षण देऊ देणार नाही, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR