22 C
Latur
Friday, February 7, 2025
Homeक्रीडाइंग्लंड मालिकेपूर्वी अग्रवालने ठोकले आक्रमक शतक!

इंग्लंड मालिकेपूर्वी अग्रवालने ठोकले आक्रमक शतक!

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली, मात्र शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघाची निवड तीन आठवड्यानंतर केली जाणार आहे.

चेतेश्वर पुजाराने नुकतेच रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावून पुनरागमनाच्या आशा उंचावल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. यासोबतच मयंक अग्रवालनेही रणजीमध्ये शतक झळकावून रेड बॉल गेममध्ये फॉर्ममध्ये परतला आहे. या दोन्ही खेळाडूंनी पुढील काही सामन्यांमध्ये अशाच मोठ्या खेळी खेळल्या तर ते इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी आपला दावा मजबूत करू शकतात.

रणजी ट्रॉफीमध्ये मयंक अग्रवाल कर्नाटकचा कर्णधार आहे. त्याने शनिवारी गुजरातविरुद्ध अप्रतिम शतक झळकावले. त्याने १२४ चेंडूत १०९ धावांची खेळी केली. मयंकच्या या खेळीमुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणा-या या सामन्यात कर्नाटक संघ मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल करत आहे. येथे गुजरातने पहिल्या डावात २६४ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्नाटक संघाने ५ गडी गमावून ३२८ धावा केल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR