लातूर : प्रतिनिधी
लातूरचा माणूस स्वकर्तृत्वाने मोठा होतो. लातूरची माती व पाण्याचा हा गुणच आहे, असे गौरवोद्गार राज्याचे क्रीडा व युवककल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी काढले. लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून प्रवीण सरदेशमुख यांची निवड झाली. या निमित्ताने केदारनाथ प्रतिष्ठान, लातूर, विलासराव देशमुख फाउंडेशन, लातूर, संदपनी टेक्निकल कॅम्पस, लातूर, डी. बी. ग्रूप ऑफ इन्स्टिटयूशन्स, महाळंग्रा, जीवनरेखा प्रतिष्ठान, लातूर, वेताळेश्वर शिक्षण संस्था, हासेगाव,भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री केशवराज शैक्षणिक संकुल, लातूर, नवनिर्माण प्रतिष्ठान, लातूर व महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूरच्या वतीने त्यांचा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बनसोडे बोलत होते अध्यक्षस्थानी तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुधाकर शृंगारे, आमदार अभिमन्यू पवार, उद्योजक विवेक देशपांडे,ज्येष्ठ पत्रकार सुहास सरदेशमुख, अशोक शेल्हाळकर, प्रा. डॉ. रघुनाथ होळंबे, अॅड. व्यंकट बेद्रे यांच्यासह डॉ. जगन्नाथ पाटील, माधवराव पाटील टाकळीकर, सुधीर धुत्तेकर, शैलेश कुलकर्णी, प्रवीण कस्तुरे, अशोक शिवणे, संजय गुरव, तुकाराम गोरे, सुनील होनराव, डॉ. ब्रिजेश अय्यर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, आमदार अभिमन्यू पवार, विवेक देशपांडे, डॉ. कारभारी काळे, अशोक शिवणे, उमेश सेलूकर, जगन्नाथ पाटील, सुहास सरदेशमुख, प्रकाश रायचुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रवीण सरदेशमुख व सौ. सरदेशमुख यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुधीर धुत्तेकर यांनी केले. सूत्रसंचालन धनंजय कुलकर्णी (माटेफळकर) व अश्विनी बिराजदार यांनी केले. प्रवीण कस्तुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.