18.4 C
Latur
Saturday, January 25, 2025
Homeपरभणीपरभणीत २८ जानेवारीला शिवा संघटना वर्धापन दिनाचे आयोजन

परभणीत २८ जानेवारीला शिवा संघटना वर्धापन दिनाचे आयोजन

परभणी : शिवा संघटनेच्या स्थापनेला २८ वर्ष पूर्ण होत असून या निमित्त २८ जानेवारी रोजी परभणी शहरातील वसमत रोडवरील श्री सारंग स्वामी विद्यालयात संघटनेच्या २८व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिवा संघटनेने राजकीय पटलावर काम करण्यासाठी सेवा जनशक्ती पार्टी स्थापन केली असून याला नुकतीच निवडणूक आयोगाकडून मंजूरी मिळाली आहे. सेवा जनशक्ती पार्टीचा १ला वर्धापन दिनही यावेळी साजरा करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील ४० विधानसभा मतदारसंघांमध्ये वीरशैव लिंगायत समाज प्रभावशाली असून राज्यपातळीवरील इतर १६ संघटनांसोबत सेवा जनशक्ती पक्ष म्हणून लवकरच स्वतंत्र भुमिका मांडण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांना चचेर्ची दारे खुली आहेत, अशी माहिती शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

शिवा संघटनेच्या वतीने मंगळवार, दि.१६ जानेवारी रोजी हॉटेल निरज इंटर नॅशनल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवा संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, शिवा संघटना विद्यार्थी आघाडी नांदेड शुभम घोडके, लोहा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवेश्वर धोंडे यांच्यासह जिल्हा मार्गदर्शक उत्तमराव भस्के, जिल्हाध्यक्ष रामेश्वर कुबडे, जिल्हा उपाध्यक्ष दादा कापसे, शहराध्यक्ष कोंडीराम नावकीकर, पालम तालुका मार्गदर्शक नागनाथअप्पा खेडकर, सेलू तालुका मार्गदर्शक दगडय्या मुदकलकर, परभणी तालुका अध्यक्ष शिवा दामोदर, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जनार्दन खाकरे, कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष माधव सोनटक्के, गुलाब बिडकर, संभाजी शेवटे, मयूर पेटे, सूर्यकांत शिवणकर, नरवाडे एम. एस., गंगापूरे डी. एल., थोरात आर. पी., निलंगे नारायण आदी शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR