16.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeक्रीडाभारतीय महिला हॉकी संघ उपान्त्य फेरीत

भारतीय महिला हॉकी संघ उपान्त्य फेरीत

रांची : यजमान भारतीय महिला हॉकी संघाने येथे सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीतील ब गटातील साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत इटलीचा ५-१ असा धुव्वा उडवला आणि उपान्त्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेमध्ये अव्वल तीन स्थानांवर येणारे देश थेट पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे आता भारतीय महिला हॉकी संघाच्या ऑलिम्पिक प्रवेशाच्या आशा उंचावल्या आहेत.

भारताचा इटलीविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. पहिल्या मिनिटालाच उदिताने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ४० मिनिटांपर्यंत दोन्ही देशांना गोल करता आले नाहीत.

दीपिकाने पेनल्टी स्ट्रोकवर भारतासाठी दुसरा गोल केला. सलीमा टेटे हिने ४५व्या मिनिटाला अप्रतिम फिल्ड गोल करीत भारताचे वर्चस्व प्रस्थापित केले. नवनीत कौरने ५३व्या मिनिटाला चौथा गोल केला. उदिताने ५५व्या मिनिटाला स्वत:चा दुसरा व संघाचा पाचवा गोल करीत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR