29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeक्रीडाहार्दिक पांड्याचे कमबॅक?

हार्दिक पांड्याचे कमबॅक?

नवी दिल्ली : स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याचा टीम इंडियातील कमबॅकचा प्रश्न अधिकच कठीण होत चालला आहे. वनडे विश्वचषकात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो टीम इंडियाबाहेर आहे. हार्दिक पांड्या आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे, पण तो मैदानात कधी कमबॅक करणार? याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यातच शिवम दुबे ज्या पद्धतीने फॉर्ममध्ये आहे, ते पाहता हार्दिक पांड्यांचे टीम इंडियातील कमबॅक कठीण होऊन बसले आहे. त्यातच रोहित शर्मा दीड वर्षानंतर टी-२० संघात परतला आहे.

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने शिवम दुबे याच्यावर डाव खेळला. अफगाणिस्तानविरोधातील टी-२० मालिकेत शिवम दुबे याने प्रभावी कामगिरी करत निवड सार्थ असल्याचे दाखवून दिले. दोन सामन्यांत त्याने बॅट आणि चेंडूने कमाल केली. पहिल्या दोन्ही टी-२० सामन्यांत शिवम दुबे याने नाबाद अर्धशतके ठोकली.

शिवम दुबेच्या या कामगिरीमुळे बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याचा समावेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जर असे घडले आणि शिवम दुबेचा आयपीएलमध्येही फॉर्म कायम राहिला तर त्याची टी-२० विश्वचषक खेळण्याची शक्यता आणखी वाढतेय. त्यामुळे हार्दिक पांड्याला टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

रोहित शर्माचे कमबॅक
हार्दिक पांड्याची दुखापत लक्षात घेऊन बीसीसीआयने आपला बॅकअप प्लॅन तयार केला आहे. रोहित शर्माचे तब्बल १४ महिन्यांनंतर टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. पहिल्या दोन सामन्यांत रोहितला फलंदाजीत लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पण रोहितकडे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आयपीएलचा संपूर्ण हंगाम आहे. रोहितला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली तर त्याला संघाचे कर्णधारपद मिळणार हे निश्चित मानले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR