पुणे : राज्यात सुरू असणा-या ऊसाच्या गाळप हंगामात आजवर ४७३ . ९३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले असून उतारा ९.२ टक्के असल्याची माहिती साखर आयुक्तं कार्यालयाकडून सांगण्यात आली. राज्यात कोल्हापूर विभागात सर्वात जास्त म्हणजे १०.५४ टक्के उतारा मिळाला आहे
उपलब्ध माहितीनुसार राज्यात एकूण १९७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला असून त्यामध्ये ९७ सहकारी आणि ऊर्वरीत १०० कारखाने खासगी आहेत. तसेच आजवर राज्यातील विभागात ५१५ . ९९ लाख मे टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे गतवर्षी एकूण साखर कारखान्यांची संख्या २०४ इतकी होती त्यामध्ये सहकारी कारखाने १०४ होते त्यामध्ये घसरण होऊन ही संख्या ९७ पर्यन्त खाली आली आहे.
यंदाच्या गाळप हंगामात देशात ३२. ७ दशलक्ष टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन कार्यकारी सदस्य रवी गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. तर साखरेच्या किमती प्रति क्विंटल ३६५० वरुन ३४८० रुपयापर्यंत खाली घसरल्या आहेत.