लातूर : प्रतिनिधी
मांजरेच्या वाहत्या पाण्याला दूथडी अडवून उभय तिरावरील तृषार्त भूमीला सुजलाम् सुफलाम् करण्याचे अभिनव स्वप्न विकासरत्न विलासराव देशमुख यांनी पाहिले आणि ते स्वप्न साकारले गेल्याने मांजरा, तेरणा व रेणा नदीवरील बराज आजघडीला शेतक-यांसाठी शाश्वत स्त्रोत बनले आहेत. जिल्ह्यात एकुण २८ बराज आहेत. त्यापैकी ७ बराजमध्ये पााणीसाठा शुन्यावर असल्याने उर्वरीत २० बराजमध्ये सद्य:स्थितीत २९.८२३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३८.४७ टक्के पाणीसाठा आहे. तर जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांमध्ये केवळ १८.५० टक्के इतका पाणीसाठा आहे. प्रकल्पांपेक्षा बराजमध्ये ब-यापैकी पाणीसाठा आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईत बराजमधील पाणी उपयुक्त ठरणार आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर शहर व परिसरातील पाणीपुरवठा योजनेसाठी शाश्वत स्त्रोताच्या निश्चितीकरणासाठी उच्चाधिकारी समितीची नियुक्ती केली होती. उच्चाधिकार समितीने मांजरा नदीवर मांजरा धरणाच्या खालील बाजूस १००.०३ दलघमी पाणी उपलब्ध केल्यानूसार बोरगाव-अंजनपूर, वांजरखेडा, कारसा-पोहरेगांव, खुलगापूर, डोंगरगाव, धनेगाव येथे सहा बंधारे व तावरजा नदीवर भूसणी येथे एक असे एकुण सात बंधा-यांसाठी एकुण ७७.२३ दलघमी पाण्धाी वापरण्याचे प्रस्तावित केले होते.
उच्चाधिकार समितीने प्रस्तावित केलेल्या पाण्याचे प्रत्यक्ष पाणीवापराचे फेरनियोजन करुन मांजरा नदीवर साई-महापूर, शिवणी, टाकळगाव-देवळा, होसून तालुका निलंगा तसेच लासरा तालुका कळंब येथे नवीन बॅरेजेस् प्रस्तावित करण्यात आले होते. मांजरा खो-यात अनियमित व अवेळी पडणारा पाऊस यामुळे कोल्हापूरी बंधा-यांमध्ये मनुष्यबळाने वाहत्या पाण्यामध्ये दरवाजे टाकण्याचे जिकिरीचे व अडचणीचे काम होते. कोल्हापूरी बंधा-यांमध्ये अपेक्षीत पाणीसाठा करता येत नव्हता. त्यामुळे परीसरात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. ही बाब लक्षात घेता कोल्हापूरी पद्धतीच्या बंधा-यांच्याद्वारांमध्ये नवीन तांत्रिक सुधारणा करुन बॅरेजेप्रमाणे उभ्या उचल पद्धतीचे विद्युत संचलीतद्वारे बसवून बॅरेजेमध्ये रुपांतर करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यास मंजूरी मिळाली आणि महाराष्ट्रात प्रथमच मांजरा नदीवरील बिंदगीहाळ, नागझरी, वांगदरी या तीन कोल्हापूरी बंधा-यांचे बॅरेजच्या धर्तीवर रुपांतर करण्यात आले. त्यामुळे बंधा-यांमध्ये पुर्ण क्षमतेने १०० टक्के पाणीसाठ्याची शाश्वत स्त्रोताची निर्मिती होऊन ९९३ हेक्टर सिंचन क्षेत्र पुर्नस्थापीत झाले आहे. त्याचा लाभ शेतक-यांना मिळत आहे.
मांजरा नदीवरील १५ बराजेस्मध्ये उपयुक्त पाणीसाठा २७.३५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४२.१८ टक्के पाणीसाठा आहे. नदीवरील बराजमधील पाणीसाठा पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे पाणीसाठ्याच्या टक्केवारीची आहेत. लासरा बराजमध्ये ०.००० दलघमी (०.००), बोरगाव अंजनपूर-०.००० (०.००), टाकळगाव देवळा- ०.४१८ (२१.८२), वांजरखेडा- १.५९७ (४४.३६), वांगदरी- ०.४६८ (५५.५२), कारसा पोहरेगाव- १.५४९ (४५.४३), नागझरी-२.०५० (५८.८१), साई-१.०००(२८.८२), खुलगापूर- ६.४८७ (६६.८२), शिवणी- ०.८३७ (८.५३), बिंदगीहाळ- ०.४३७ (३२३७), डोंंगरगाव- ५.८९१ (७४.५५), धनेगाव- ५.५५४ (५०.०३), होसूर-०.१८४ (८.१८) व भूसणी बराज(तावरजा नदी)-०.८८१(५९.१५ दलघमी). मांजरा नदीवरील या १५ बराजमध्ये ४२.१८ दशलक्षघनमीटर पाणीसाठा आहे. तेरणा नदीवरील राजेगाव, किल्लारी क्र. २, लिंबाळा, मदनसूरी, गुंजरगा, औराद शहाजनी व तगरखेडा या ७ बराजमध्ये २.४२९ दशलक्ष घनमीटर म्हणजे २४.९८ टक्के पाणीसाठा आहे.