लातूर : प्रतिनिधी
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी एक वर्षांपुर्वी नियुक्ती झालेले डॉ. समीर जोशी यांची स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदी शासनाने याच महाविद्यालयातील डॉ. उदय शेषेराव मोहिते यांची अधिष्ठातापदी दि. १७ जानेवारी रोजी नियुक्ती केल्याचा शासनादेश काढला आहे.
डॉ. उदय मोहिते हे एमएस (नेत्रशल्यचकित्साशास्त्र), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथुन केले आहे. या विषयात त्याना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सन २००० साली सुवर्णपदक प्राप्त झालेआहे. गेल्या १५ वर्षापासून प्राध्यापक व नेत्रविभाग प्रमुख या पदावर ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर अकॅडेमिक कौन्सिल मेंबर म्हणुन सध्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे राज्यधक्ष म्हणुन काम पाहिले आहे. डॉ. उदय मोहिते आज दि. १८ जानेवारी रोजी अधिष्ठाता पदाचा पदभार घेणार आहेत.