सॅन्फ्रान्सिस्को : गुगलच्या मालकीची कंपनी युट्यूबने व्यवस्थापन आणि ऑपरेशन्स टीममधून किमान १०० कर्मचा-यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वुट्यूबचे चीफ बिझनेस ऑफिसर मेरी एलेन को यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली.
गुगलचे सीईओ पिचाई यांनी आश्वासन दिले की, आगामी कर्मचारी कपात गेल्या वर्षीइतकी मोठी असणार नाही आणि प्रत्येक टीमवर त्याचा परिणाम होणार नाही. परंतु मला माहित आहे की तुमचे सहकारी आणि टीमला कर्मचारी कपातीमुळे प्रभावित झालेले पाहणे कठीण आहे.
गेल्या वर्षी १२ हजार कर्मचा-यांची हकालपट्टी
गुगलने गेल्या वर्षी सुमारे १२ हजार कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले होते. त्या कपातीमध्ये हार्डवेअर, जाहिरात, खरेदी, धोरण, अभियांत्रिकी आणि युट्यूब यासह सर्व टीमच्या कर्मचा-यांना फटका बसला होता.