29.7 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रतुरीच्या भावात उसळी

तुरीच्या भावात उसळी

वाशिम : राज्यातील काही बाजार समित्यांत तुरीच्या भावात चांगलीच उसळी पाहायला मिळाली आणि तुरीच्या भावाने १० हजारांचा टप्पा ओलांडला. आठवड्यात खरेदीच्या शेवटच्या दिवशी तुरीच्या भावात ही तेजी दिसून आली असली तरी पुढच्या आठवड्यात भावातील ही तेजी टिकून राहणार का, ते पाहूनच शेतक-यांनी

तूर विक्रीचा निर्णय घेणे अपेक्षित आहे.
देशांतर्गत यंदा तुरीचे उत्पादन घटले आहे. अशातच केंद्र शासनाने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून बाजारभावाने खुल्या बाजारात तूर खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत. म्हणजेच यंदा केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सात हजार रुपये प्रतिक्विंटल या हमीभावापेक्षा अधिकच्या दरात शासनाच्या माध्यमातून तूर खरेदी होणे अपेक्षित आहे. यामुळे काही व्यापा-यांनी आणि तूर बाजारातील अभ्यासकांनी लवकरच तुरीचे बाजारभाव ११ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचतील, अशी आशा व्यक्त केली आहे.

अकोला, हिंगोली, वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांत शुक्रवारी तुरीचे भाव १० हजार रुपयांवर पोहोचले. वाशिम बाजार समितीत तुरीला कमाल १० हजार ७० रुपये प्रति क्विंटल, तर कारंजा बाजार समितीत तुरीला कमाल १० हजार ४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला, उत्पादनात आलेली घट आणि शासनाने बाजारभावातील खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय पाहता तुरीचे बाजारभाव ११ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जातील, असे बोलले जात आहे. त्यामुळे शेतक-यांनी पुढील काळात दरवाढीचा अंदाज घेऊन टप्प्याटप्याने तुरीची विक्री करणेच योग्य ठरणार आहे.

उत्पादनात मोठी घट
यंदा तुरीच्या उत्पादनात जवळपास ५० टक्क्यांपर्यंत घट येईल, अशी भीती काही तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. खरीप हंगामात झालेला कमी पाऊस आणि हवामानबदल या कारणांमुळे तुरीकर विविध किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीच्या उत्पादनात मोठी घट य्ेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR