17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeअंतरराष्ट्रीय‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वरील हल्ल्यात मृत्यू; तब्बल २२ वर्षांनंतर पटली ओळख

‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वरील हल्ल्यात मृत्यू; तब्बल २२ वर्षांनंतर पटली ओळख

न्यूयॉर्क : अमेरिकेतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीची ओळख आज २२ पटली आहे. जॉन बॅलेन्टाइन निवेन (वय ४४) असे या व्यक्तीचे नाव असल्याचे न्यूयॉर्कच्या वैद्यकीय अधिका-यांनी जाहीर केले. जॉन हे एका विमा कंपनीत कार्यरत होते. त्यांचे कार्यालय वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या १०५ व्या मजल्यावर होते.

दहशतवाद्यांनी विमान धडकविल्यानंतर इमारतीमध्ये मोठा स्फोट झाला. आग लागली आणि काही मिनिटांतच या गगनचुंबी जुळ्या इमारती कोसळल्या. या घटनेतील अनेक मृतांची ओळख त्याचवेळी पटली असली तरी जवळपास ४० टक्के जणांचे मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे असल्याने त्यांच्या अवशेषांवर विविध चाचण्या घेतल्या जात आहेत.

अवशेषांची डीएनए चाचणी घेतली जात असली तरी अवशेषांच्या २१,९०० तुकड्यांमधून व्यक्तीची ओळख पटविणे, हे अत्यंत जिकिरीचे काम असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. या हल्ल्यात सुमारे ३ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी जॉन निवेन हे ओळख पटलेली अखेरचे व्यक्ती ठरले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR