21.3 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeराष्ट्रीयभारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद होणार!

भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद होणार!

दिब्रुगड : म्यानमार सीमा अधिक सुरक्षित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. म्यानमारच्या सीमेवर आता तारेचे कुंपण करण्यात येणार आहे. त्याशिवाय ये-जा करणेही यापुढे परवानगीशिवाय शक्य होणार नाही, असे अमित शाह यांनी सांगितले. म्यानमारच्या 600 सैनिकांनी आणि नागरिकांनी मिझोराममध्ये घुसखोरी केली, यावर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलत होते.

मागील काही दिवसांपासून भारत आणि म्यानमार यांच्यातील सीमावाद उफाळला होता. सीमारेषावर तणावाचे वातावरण होते. म्यानमार सीमेवरील मोफत ये-जा यापुढे बंद करण्यात येणार आहे. लवकरच केंद्र सरकार याबाबत अंमलबजावणी करेल, असे अमित शाह यांनी सांगितले.

शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसामच्या दौ-यावर होते. यावेळी त्यांनी भारत आणि म्यानमार सीमाबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, भारत आणि म्यानमार सीमा याआधी सर्वांसाठी खुली होती, पण यापुढे कुंपण घातले जाणार आहे. घुसखोर आणि म्यानमारमधून पळून जाणा-या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सरकार दोन्ही देशांमधील मुक्त संचारही बंद करणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR