मुंबई : लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. अशातच जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. लोकसभेच्या जागावाटपावरून इंडिया आघाडीत मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या चर्चांवर त्यांनी पडदा टाकला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडीची २ दिवसांत बैठक पार पडेल. २५ तारखेला जागावाटप जाहीर होईल. एकत्रित जागावाटप बैठक त्याच दिवशी आहे. कोणत्याही प्रकारचे वाद आमच्यात नाहीत, असे जयंत पाटील यांनी जाहीर केले.
आज आमची सुनावणी पार पडली. समोरच्या बाजूने वेळ मागितला. शरद पवार हे सर्वांना बोलवायचे आणि निर्णय घ्यायचे प्रांताध्यक्ष म्हणून, अध्यक्ष म्हणून तटकरे यांनी दीर्घकाळ काम केले आहे. शरद पवार यांनी एकांगी कधीही निर्णय घेतला नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या सुनावणीमध्ये फरक आहे. आम्ही पूर्वानुभवानुसार घटनेमध्ये काही बदल केलेले आहेत. आम्ही योग्य खबरदारी घेतलेली आहे. अजित पवार गटाने मुदतवाढ मागितली आहे. आमच्या वकिलांनी त्यांना विरोध केला पण अध्यक्षांनी वेळ मागितला. अनिल पाटील हे २०१९ मध्ये आमच्या पक्षात आले. आमचा पक्ष कसा चालतो, त्यांना माहीत नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.