22.8 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रएसटीची १० टक्के हंगामी भाडेवाढ!

एसटीची १० टक्के हंगामी भाडेवाढ!

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या काळात सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. महसूल वाढविण्याच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार एसटी महामंडळाने या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून २७ नोव्हेंबरदरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी राहील. ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केले आहे, त्यांच्या तिकिटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या काळात म्हणजे सणासुदीच्या काळात प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

एसटी महामंडळ मागच्या काही वर्षांपासून दिवाळीच्या काळात लोकांचा गावी येण्याचा ओढा लक्षात घेऊन हंगामी भाडेवाढ करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐन दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. यासोबतच खाजगी वाहनधारकही दरवाढ करतात. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR