21 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeमुख्य बातम्यामराठा आरक्षण : वंशावळीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची सरकारची भूमिका

मराठा आरक्षण : वंशावळीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची सरकारची भूमिका

तहसिलदार, नायब तहसिलदारांना प्रमाणपत्र वाटपाचे अधिकार प्राप्त होणार

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन केले जात आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मागणीसाठी समर्थकांसह मुंबईची वाट चालत आहेत. तसेच २६ तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण देखील सुरू करणार आहेत. यादरम्यान राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठे पाऊल उचलले असून वंशावळीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची भूमिका घेतली आहे.

राज्य सरकारकडून वंशावळीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. वंशावळ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी शासनाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे.

तहसिलदार व नायब तहसिलदार यांना वंशावळीनुसार प्रमाणपत्र वाटपाचे अधिकार दिले जाणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांकडे सहीसाठी पाठवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारकडून सतत आपण आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान जरांगे हे २६ जानेवारी रोजी हजारो मराठा बांधवांना सोबत घेऊन मुंबईत पोहचणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR