15.7 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeधाराशिवऊसतोड मजुराची आत्महत्या, परळीतील तीघांवर गुन्हा दाखल

ऊसतोड मजुराची आत्महत्या, परळीतील तीघांवर गुन्हा दाखल

धाराशिव : प्रतिनिधी
पाथरी (जि.परभणी) तालुक्यातील बाबुलतार येथील एका ऊसतोड मजुराने तुळजापूर तालुक्यातील ईटकळ शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाणे येथे परळी (जि.बीड) तालुक्यातील रेवली येथील तीघांवर दि. २१ जानेवारी रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुलतार ता. पाथरी जि. परभणी येथील मयत प्रकाश साहेबराव डोंगरे यांनी तीघांच्या त्रासाला कंटाळून दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी ईटकळ येथे गळफास घेवून आत्महत्या केली. रेवली ता. परळी येथील आरोपी कृष्णा परमेश्वर कांदे, अमोल परमेश्वर कांदे, गोविंद कांदे या तीघांनी प्रकाश डोंगरे यांना मुलाने ऊसतोडीसाठी घेतलेली उचलीमुळे त्रास देत होते. मयत प्रकाश डोंगरे यांचा मुलगा महेंद्र डोंगरे यास उस तोडण्यासाठी तीन लाख तीस हजार रुपये दिले होते. परंतु महेंद्र डोंगरे हा पुणे येथे गेल्याने आरोपी हे मयत प्रकाश डोंगरे यांना सतत तुझा मुलगा कारखाना सुरु होण्याअगोदर ट्रॅक्‌टरवर आला पाहीजे, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन धमकी देत होते.

त्यांच्या जाचास व त्रासास कंटाळून प्रकाश डोंगरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी मयताची पत्नी सुनिता प्रकाश डोंगरे यांनी दि. २१ जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पोलीस ठाणे येथे अ्रॅट्रासिटीसह विविध कलमान्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR