27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये भीषण आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

पिंपरी- चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली आहे. आगीमध्ये होरपळून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमधल्या वाल्हेकरवाडी येथे ही घटना घडली आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ललित अर्जुन चौधरी (२१ वर्षे) आणि कमलेश अर्जुन चौधरी (२३ वर्षे) या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. आधी लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, लाकडाच्या वखारीला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. विनायक अ‍ॅल्युमिनियम प्रोफाईल डोअर हे त्याला लागून असल्यामुळे ही आग आणि धूर अ‍ॅल्युमिनियम प्रोफाईल डोअर शेडमध्ये गेला. त्या शेडला एकच दरवाजा असल्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाला. तसेच त्या शेडमध्ये पोटमाळ्यावर अडकलेल्या दोन व्यक्ती धुरामुळे बेशुद्ध झाल्या. आगीत पोटमाळ्यावर झोपलेल्या दोघांचा झोपेतच होरपळून मृत्यू झाला आहे.

परिसरातील रहिवासी सगळे झोपेत असताना अचानक आग लागली. गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचे दिसले. यानंतर जीव वाचवण्यासाठी कामगारांची पळापळ सुरू झाली. आरडाओरड करत इतरांना जागे करण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी बादलीच्या साह्याने पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात यश आले. आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR