नाशिक : उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन नाशिक येथे सुरु आहे. या अधिवेशनाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी महत्वाचे ४ ठराव संमत करण्यात आले.
सकाळच्या सत्रात खासदार संजय राऊत यांनी चौफेर टीका केली. या अधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पण तुफान फटकेबाजी केली. कितीही चौकशा केल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. तुमच्या चौकश्या करुन तुम्हाला तुरुंगात टाकू असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार येणार असा निर्धारच त्यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवला. या अधिवेशनात काही ठराव सुद्धा मंजूर करण्यात आले.
हे ठराव केले मंजूर….
१) देशवासीयांचे पोट भरण्याचे काम मुंबई करते, मुंबईचे आर्थिक महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे, हे अधिवेशन याचा धिक्कार करत आहे.
२) मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्याचा निर्धार
३) केंद्र सरकारने जो कंत्राटीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे.
४) सरकारी सेवेसाठी नोकर भरती कायमस्वरूपी सरकारी यंत्रणेचा वापर करुन करावी.