22 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळेच राज्य मागे पडले

उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळेच राज्य मागे पडले

मुंबई : उद्धव ठाकरेंनी सत्ता आणि खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. उद्धव ठाकरेंच्या अहंकारपणामुळेच राज्य मागे पडले. उद्धव ठाकरेंचे वागणं म्हणजे लग्न एकाबरोबर, संसार दुस-याबरोबर अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९८वी जयंती.

या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२३) माध्यमांशी संवाद साधला. पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज राज्यात बाळासाहेबांच्या विचारांचे, त्यांना अभिप्रेत सरकार कार्यरत आहे. दलित, महिला आणि वंचितांचा विकास करणे हाच बाळासाहेबांचा विचार होता. बाळासाहेबांनी कायम विकासाला प्राधान्य दिले. त्यांच्या याच विचारावर सरकारचे राज्याच्या विकासाचं काम सुरू आहे. या सरकारसोबत पीएम मोदी खंबीरपणे उभे आहेत, असा उल्लेख देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.

खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली
राम मंदिर उभा राहणे हे बाळासाहेबांचे देखील स्वप्न होते. त्यांची देखील काल अयोध्येत स्वप्नपूर्ती झाली, याचे मला समाधान आहे. उद्धव ठाकरेंनी सत्ता आणि खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, असा आरोप देखील शिंदे यांनी ठाकरेंवर केला आहे.

जो रामाचा नाही, तो कामाचा नाही
रामाला विरोध करणा-यांना रामाबाबत बोलण्याचा अधिकार नाही. जो रामाचा नाही, तो कामाचा नाही (जो राम का नाही, ओ किसी काम का नही) अशी टीका देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंना रामाने सदबुद्धी देवो, अशी अपेक्षाही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR