25.2 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeमहाराष्ट्रजरांगेंच्या आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; सदावर्तेंचा आरोप

जरांगेंच्या आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; सदावर्तेंचा आरोप

मुंबई : मुंबईतील मराठा आंदोलनाविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी होणार असून, गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, सुनावणीपूर्वी सदावर्ते यांच्याकडून मनोज जरांगे यांच्यावर काही गंभीर आरोप देखील करण्यात आले आहेत. मनोज जरांगे यांची अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे त्यांची हीच पार्श्वभूमी लक्षात घेता मुंबई आंदोलनाला परवानगी देऊ नयेत अशी आमची मागणी असल्याचे सदावर्ते म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना सदावर्ते म्हणाले की, ‘संविधानिक अधिकारांमध्ये तुम्हाला शांततामय पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, कुणाला वेठीस धरण्याचा अधिकार नाही. म्हणजेच शांती उद्ध्वस्त करण्याचा अधिकार नाही. त्यासोबतच तुमची पार्श्वभूमी अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची आहे.

त्यामुळे मनोज जरांगे यांची पार्श्वभूमी लक्षात घेता आणि ज्या प्रकारे आज पुन्हा ‘बंद’ दिसतात ज्याप्रकारे शाळा बंद आहेत, दळणवळणाची साधनं बंद आहेत. मुंबईतल्या मार्केट कमिटी बंद आहेत. ज्यात कष्टक-यांच्या तोंडातला घास आणि पोटावरची गोष्ट असेल. या सगळ्या गोष्टी अत्यंत वेदनाजनक असल्याचे सदावर्ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR