22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रगर्लफ्रेंडचे दुस-याशी चॅटिंग; संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीला संपविले

गर्लफ्रेंडचे दुस-याशी चॅटिंग; संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीला संपविले

नाशिक : मोबाईलवर दुस-या व्यक्तीबरोबर चॅटिंग करते, या रागातून संतप्त प्रियकराने प्रेयसीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी उघड झाली. रासबिहारी लिंक रोडवरील मोकळ्या जागेत तिचा मृतदेह फेकून प्रियकरासह त्याच्या मित्राने पोबारा केला. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत प्रियकराला ताब्यात घेतले. सागर चिवदास तडवी (वय २१, रा. अंबड, मूळ रा. नंदुरबार) असे संशयिताचे नाव आहे.

शहरात नववर्षात खुनाची पहिली घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रियंका वीरजी वसावे (वय २०, रा. नंदुरबार) असे मृत तरुणीचे नाव आहे. पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी मोकळ्या जागेत तरुणीचा मृतदेह आढळल्याचा ‘कॉल’ पोलिसांना आला. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांचे पथक दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आजूबाजूच्या साहित्याची तपासणी करण्यात आली. तरुणीच्या आधार कार्डवरून तिची ओळख पटली.

घटनास्थळी पंचनामा केल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिस अंमलदार कैलास शिंदे व संदीप मालसाने यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथक संशयिताच्या घरी पोहोचले. तेथे त्याला ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. पोलिसांनी ‘दणका’ देताच संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR