22.1 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeधाराशिवमांजरा शुगर इंडस्ट्रीज कंचेश्वर कारखाना येथे ५,६०,००१ व्या साखर पोत्याचे पूजन

मांजरा शुगर इंडस्ट्रीज कंचेश्वर कारखाना येथे ५,६०,००१ व्या साखर पोत्याचे पूजन

धाराशिव : प्रतिनिधी
तुळजापुर, धाराशिव, लोहारा, औसा व परिसरातील अन्य गावांतील शेतक-यांसाठी वरदान ठरत असलेल्या तुळजापूर तालुक्यातील मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) या कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील उत्पादीत ५,६०,००१व्या साखर पोत्याचे पूजन मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, सुवर्णाताई देशमुख, श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, अभिनेते रितेश विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख, दीपशिखाताई धिरज देशमुख, रियान देशमुख, वंश देशमुख, दिवीयाना देशमुख यांच्या हस्ते शनिवारी (दि.२७) झाले.

कारखान्याने हंगाम २०२३-२४ मध्ये आज अखेर २,७८,९०० मे टन गाळप केलेले असून याच हंगामात कारखाना किमान ४,२५,००० मे टन गाळप करणार आहे. कारखान्याने या हंगामात प्रती १० दिवसाला ऊसाचे रू.२,६०० प्रमाणे पेमेंट करीत आहे. हा कारखाना मांजरा परिवारातील असून मांजरा परिवराप्रमानेच याची वाटचाल सुरू असल्याने या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. बळीराजाला रास्त भाव देऊन त्यांची आर्थिक उन्नती करणे हाच मांजरा परिवाराचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी त्यांचा ऊस मांजरा शुगर इंडस्ट्रीज यांनाच देणार असल्याची चर्चा या भागात चालू आहे. तसेच या कारखान्याकडे ऊस पुरवठा ठेव शेअर्स करिता शेतक-याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

या कार्यक्रमास माजी आमदार त्र्यंबक भिसे, धनंजय देशमुख कॉंग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, धर्यशिल पाटील, मुकुंद डोंगरे, सुरेश डोंगरे तसेच जागृती शुगरचे व्हा चेअरमन लक्षमणराव मोरे, संचालक दिलीप माने, जी एम येवले, रेणा साखरचे चेअरमन सर्जेराव मोरे व्हा चेअरमन, अनंतराव देशमुख, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक भीमराव मोर, संत शिरोमणी कारखान्याचे नूतन चेअरमन शाम भोसले, व्हा. चेअरमन सचिन पाटील, माजी चेअरमन बजुळगे, कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे, मांजरा करखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई, जिल्हा बँकेचे व्हा चेअरमन प्रमोद जाधव, संचालक अनुप शेळके, मारुती पांडे व सर्व संचालक/संचालिका, कार्यकारी संचालक एच जे जाधव, विलास कारखान्याचे व्हा चेअरमन रवींद्र काळे, कार्यकारी संचालक देसाई, तसेच सचिन दाताळ, संतोष देशमुख, सी ए धनंजय दारफळकर, संभाजी रेड्डी, कदम, पी ए फंड, सचिन मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे अधिकारी सुंदर साळुंके, उत्तम रायकर, अभय तिवारी, संतोष जाधव, जी एम अजित कदम, जी एम आर के कदम, जी एम सतीश वाकडे व सर्व कर्मचारी कामगार यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR