27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रपलटी राजकारणात नितीश कुमारांचा विक्रम : पवार

पलटी राजकारणात नितीश कुमारांचा विक्रम : पवार

मुंबईः नितीश कुमार यांच्या पलटी राजकारणावर शरद पवार यांनीदेखील भाष्य केलं आहे. पवार म्हणाले की, नितीश कुमारांनी भाजपला सोडत आरजेडीसोबत युती केली होती. आता त्यांनी पुन्हा आरजेडीला दूर ठेवत भाजपला जवळ केलं आहे. नितीश यांनी रेकॉर्ड केलं आहे. सुरुवातीला त्यांनीच पुढाकार घेत विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. मात्र त्यांनी आता पुन्हा भूमिकाबदल केल्याचं पवार म्हणाले. शिवाय अशी स्थिती आजवर कधी निर्माण झाली नव्हती, असा टोला त्यांनी लगावला.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी राज्यपालांकडे राजीनामा देऊन सरकार विसर्जित केलं. त्यानंतर रविवारी सायंकाळीच पुन्हा नव्याने शपथ घेतली. अगोदरच्या सरकारमध्ये ते आरजेडीसोबत होते. आता त्यांनी एनडीए अर्थात भाजपसोबत जाणं पसंद केलं आहे.

नितीश कुमार सातत्याने पक्षबदल करत असल्याने त्यांना पलटीराम म्हणून हिणवलं जातंय. काँग्रेसला सोबत घेऊन इंडिया आघाडी स्थापन करण्यामध्ये नितीश कुमार यांचा मोलाचा वाटा होता. भाजपला आणि पर्यायाने नरेंद्र मोदींना दूर ठेवत देशातील लोकशाही वाचली पाहिजे, अशी नितीश यांची भूमिका होती.

मात्र नितीश यांनी पुन्हा एकदा भाजपला साथ दिली आहे. सायंकाळी पाच वाजता नितीश यांनी शपथ घेतली असून भाजपच्या दोन आमदारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. एकूण ८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR