सोलापूर : सुसाट निघालेली बाईक झाडावर आदळून तीन तरुण जागी ठार झाले. सोलापुरातील महावीर चौकात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. इरण्णा मठपती (वय २४), निखिल कोळी (वय २४) व आतिश सोमवंशी (वय २२) ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. हे सर्व जुळे सोलापूर भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
तिघे मित्र मध्यरात्री दीडच्या सुमारास बाईकवरून घरी जात होते, महावीर चौकात आले असता, त्यांची गाडी झाडाला आदळली त्या भीषण अपघातात तिघे गाडीवरून लांब उडून पडले, त्यांच्या डोक्याला जबर जखम होऊन ते जागीच ठार झाले.
सध्या त्या तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली असून शोक अनावर झाल्याचे दिसून आले.