26.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रनरेंद्र मोदींसारखा नेता नाही : अजित पवार

नरेंद्र मोदींसारखा नेता नाही : अजित पवार

कोल्हापूर : नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं देशानं जवळपास ठरवलं आहे, त्यात माझा महाराष्ट्र मागे राहता कामा नये. नरेंद्र मोदींसारखा नेता नाही, देशात नजर फिरवून बघा कोण दुसरा नेता आहे का? असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते आज (29 जानेवारी) कोल्हापुरात बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार स्तुतीसुमने उधळताना सत्ता कशी आवश्यक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आम्ही सत्तेत आल्यावर टीका केली, वाचाळवीर टीका करत सुटतात, पण आम्ही केवळ विकास विकास विकास हे धोरण ठेवलं. नेत्याला विकासाची दृष्टी असावी लागते तर चांगलं काम होतं असेही ते म्हणाले.

तपास यंत्रणांबाबत एकच गोष्ट सारखी सारखी सांगितल्यावर लोकांना खरं वाटतं अजित पवार म्हणाले की, तपास यंत्रणाबाबत एकच गोष्ट सारखी सारखी सांगितल्यावर लोकांना खरं वाटतं. आमचं महाविकास आघाडीचे सरकार असताना गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला होता. माहिती मिळाली आणि तपास केला तर गोष्ट वेगळी. आपण आपल्या लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांच्यात देखील चांगलं काम करण्याची धमक असते यावर विश्वास ठेवला पाहिजे, सारखे सारखं म्हणायचं नाही याला जमेल की नाही जमेल की नाही, असेही अजित पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR