18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात पोलीस कर्मचा-यांचा पोलीस ठाण्यातच दरोडा

पुण्यात पोलीस कर्मचा-यांचा पोलीस ठाण्यातच दरोडा

पुणे : शहर पोलिस दलातील ४ पोलीस कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले आहे. या पोलीस कर्मचा-यांनी पोलीस ठाण्यातच अफरातफर केली आहे. रक्षकच असे करायला लागले तर कसं व्हायचं? अशी चर्चा परिसरात सुरु आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचा-यांनी पोलीस स्टेशनमध्ये दरोडा टाकला. पोलीस ठाण्यात कार्यरत असणा-या कर्मचा-यांनी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात जप्त केलेल्या दुचाकी विकल्या. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे अशी पोलीस कर्मचा-यांची नावे आहेत.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या आरोपीकडून चौकशी केली असता या पोलीस कर्मचा-यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले अशी कबुली या आरोपीने दिली तसेच या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलिसांनी या आरोपीला त्या बाजारात विकण्यास सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR