23.1 C
Latur
Monday, January 13, 2025
Homeसोलापूरमराठा सर्वेक्षणासाठी खासगी व्यक्तीचा वापर; कारवाईची मागणी

मराठा सर्वेक्षणासाठी खासगी व्यक्तीचा वापर; कारवाईची मागणी

सोलापूर : मराठा व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी महापालिका कर्मचाऱ्याने खासगी व्यक्तींचा वापर केल्या प्रकरणी कारवाई करावी, यांसह विविध मागण्यांचे निवेदन सकल मराठा क्रांती मोर्चा शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना देण्यात आले. मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वे क्षण कामात एका महापालिका कर्मचाऱ्याने खाजगी इसमाचा वापर केला आहे. या खासगी व्यक्तीकडून सर्वेक्षणाचे काम करून घेतले जात असल्याचा प्रकार सोमवारी भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी निदर्शनास आणून दिला.

महापालिकेचा कर्मचारी अनिल खरटमल यांनी त्यांना असणाऱ्या शारीरिक त्रासामुळे खासगी इसम ठेऊन हे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक झालेली असताना खासगी इसमामार्फत सर्वेक्षण करून सर्वे क्षणाच्या अहवालामध्ये अडथळे निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, याप्रकरणी कारवाई करावी. या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणाचा म हापालिका आयुक्तांनी आढावा घ्यावा. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार दि. २३ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान करण्यात आलेल्या म राठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण किती टक्के झाले? याचीही माहिती देण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणी चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले. यावेळी अमोल शिंदे, पुरुषोत्तम बरडे, अनंत जाधव, माऊली पवार, रवी मोहिते, राजन जाधव, किरण पवार, शिवाजी वाघमोडे, जगदीश निंबाळकर, पोपट भोसले उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR