28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर खासगी बसच्या भीषण अपघातात १५ प्रवासी जखमी

समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या भीषण अपघातात १५ प्रवासी जखमी

वाशिम : गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरअपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी (१ फेब्रुवारी) रात्री समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट महामार्गावरच उलटली. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील दोनद लोकेशन १७३ जवळ बस आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस महामार्गावरच उलटली. दरम्यान, या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना कारंजा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच, जखमींपैकी ५ ते ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचेही सांगितले जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा समोरील भाग अक्षरश: चक्काचूर झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR