पुणे : प्रतिनिधी
महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग महिलांच्या आर्थिक विकासासाठी एक चांगले साधन ठरू शकतो. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करणे तसेच राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला पर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे.
शासनाव्दारे राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला केंद्रित धोरण आखण्यात आले असून त्याच्या पंचसूत्रीनुसार हे धोरण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व पर्यटन संचालनालय यांच्यामार्फत सर्व संबंधित विभागांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.
पर्यटन हे सर्वांत वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक चांगले साधन ठरू शकतो. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला समावेशक पर्यटन धोरण शासनाने जाहीर केले आहे. महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे.
महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने/सवलती. प्रवास आणि पर्यटन विकास अशी सदर धोरणाची पंचसूत्री आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृति आराखडा तयार करणे, उपाययोजना सुचविणे व संनियंत्रण करण्यासाठी रचना करण्यात आलेली आहे, असे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले.