धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील खानापूर तसेच धाराशिव शहरातील साळुंखे नगर व उमरगा शहरात घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास केली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात ४ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील खानापूर येथे संजय अरुण गायकवाड यांचे राहाते घर चोरट्यांनी फोडले. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील ३७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचा गणपती व सरस्वती, दोन चांदीच्या वाट्या असा एकूण ७३ हजार रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. या प्रकरणी संजय गायकवाड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
दुस-या घटनेत उमरगा शहरातील शास्त्रीनगर येथे चोरट्यांनी अलका बाबू पवार यांच्या घरी चोरी केली. त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५० हजार रूपये असा एकूण ७४ हजार रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. या प्रकरणी अलका पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
तिस-या घटनेत धाराशिव शहरातील साळुंखेनगर येथे विशाल नामदेव शेरकर यांच्या घरी चोरी झाली. चोरट्यांनी विशाल शेरकर यांची अंदाजे ४० हजार रूपये किंमतीची रॉयल इनफिल्ड बुलेट चोरून नेली. विशाल माने यांचे घराचे समोर बुलेट लावली होती. या प्रकरणी विशाल शेरकर यांनी दि.४ नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे अन्वये गुन्हा नोंदवला आहे.