विशाखापट्टनम : भारताने इंग्लंडचा दुस-या कसोटीत १०६ धावांनी पराभव केला. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी आघाडी घेतली आहे. या विजयासोबतच भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेतलीे. भारतीय संघ आता दुस-या स्थानावर पोहचला आहे.
भारताने इंग्लंडचा दुस-या कसोटीत १०६ धावांनी पराभव केला. भारताने मालिकेत १-१ अशी आघाडी घेतली. मालिकेतील पहिला हैदराबाद येथील कसोटी सामना इंग्लंडने जिंकून भारताला टेन्शन दिले होते. भारत कसोटी २८ धावांनी हरला होता.
भारताने पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर त्याचा परिणाम डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलवर झाला होता. भारतीय संघ दुस-या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर पोहचला होता. ही भारताची मोठी घसरण होती.
मात्र भारताने दुस-या कसोटीत जोरदार पुनरागमन करत १०६ धावांनी विजय मिळवला अन ५२.७७ विनिंग पर्सेंटेज मिळवत दुसरे स्थान गाठले. सध्या ऑस्ट्रेलिया ५५ विनिंग पर्सेंटेजसह अव्वल स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका ५० पर्सेंटेज घेत तिस-या स्थानावर आहे.